बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत, त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असणार”

सिंधुदुर्ग | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यातच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीत सर्व रडे आहेत, तपास यंत्रणांनी कारवाई करताच रडू लागतात, असा टोला निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे. कुडाळ पंचायत समितीत शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी निलेश राणे बोलत होते.

निलेश राणे यांनी बोलताना अजित पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. ‘गडबडीसाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तींयांवर धाडी पडत आहेत. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असणार’, असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी किती लोकांची कुटूंबे उद्धवस्त केली. किती लोकांना कामाला लावलं हे ते विसरले. त्यामुळे सगळंच भोगावं लागतंय, असं निलेश राणे म्हणाले आहेत. तसेच विधायक कामांसाठी अजित पवार यांचं नाव कुठेच नाही. त्यामुळे अजित पवार यांना इथेच भोगावं लागणार आणि लांबपर्यंत जाणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना देखील लक्ष्य केलं आहे. नवाब मलिक हे आपल्या मतदारसंघात काय करतात हे सांगण्यासाठी आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तुमची अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत, असा घणाघात निलेश राणे यांनी नवाब मलिकांवर केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

पठ्ठ्याने आयफोन 12 मागवला, Flipkart ने भलतंच काही पाठवलं, व्हिडीओ पाहून सगळेच हैराण!

“मला नेहमी वाटायचं की सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे”

“..त्यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा नाहक त्रास देतात”

“मी भंगारचा व्यवसाय करत होतो याचा मला अभिमान आहे”

‘मी बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’,किरीट सोमय्यांचा पवारांना थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More