बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेत असून 100 टक्के बंद होत नसेल, तर तुमची काय लायकी आहे हे लक्षात येतं”

मुंबई | लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने संपुर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला भाजप नेत्यांनी मात्र तीव्र विरोध दर्शवला होता. तसेच लखीमपूर घटनेकडे लक्ष वळवून सरकार महाराष्ट्रातील प्रश्नांपासुन लक्ष विचलित करू पाहतंय, असा आरोपही करण्यात आला होता.

त्यातच कालच्या बंदच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच तीन पक्षांनी एकत्र येऊन पुकारलेला बंद हा जेमतेम 25 टक्के ठिकाणीच दिसला, असं म्हणत ही महाविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट असल्याचं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्या महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत. त्यामुळे हा वाद वाढतच चालला आहे. निलेश राणे यांनीही कालच्या बंदवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.

सत्तेत असूनही तिन्ही पक्ष मिळून 100 टक्के बंद करू शकले नाहीत, यावरून तुमची लायकी काय आहे हे लक्षात येतं, असं म्हणत सत्ता नसती तर एक गल्लीही बंद करण्याची धमक तुमच्यात नाही, असा घणाघाती हल्ला राणेंनी ठाकरे सरकार व महाविकास आघाडीवर केला आहे. यावर आता महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या

विराटनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडूही सोडणार आयपीएलचं कर्णधारपद?

टाटानंतर आता राकेश झुनझुनवालांना मिळाले पंख, वाचा सविस्तर

अजब चोरीची गजब कहाणी! शेतकऱ्याचा 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी केला लंपास

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय घट

कोरोना नियमांचं पालन न केल्यास भरावा लागणार ‘इतक्या’ हजारांचा दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More