बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

मुंबई | इतिहास अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. श्रीमंत कोकाटे (Dr. Shrimant Kokate) लिखित शिवचरीत्र ग्रंथ प्रकाशन सोहळा दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते पुण्यात पार पडला. त्यावेळी ग्रंथाच्या प्रकाशनसमयी त्यांनी भाषण केले होते. त्यात त्यांनी शिवशाहीर बळवंत पुरंदरे तथा बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीका केली होती.

शिवचरीत्रावर आजपर्यंत पुरंदरे यांच्याइतका अन्याय कोणी केला नव्हता, असे शरद पवार म्हणाले होते.  त्यामुळे राज्यात आणि साहित्य क्षेत्रात नवे वाद उपस्थित झाले. पुरंदरे यांच्या लिखाणावर आणि त्यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर शरद पवारांनी भाष्य केल्याने भाजप सध्या नाराज आहे. त्यात आता भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका करत एक फोटो शेअर केला आहे.

शरद पवारांवर टीका करताना त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात, कारण दोन महिने झाले त्यांनी महाराष्ट्रात कोणताही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यात पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळाले आहे. तसेच आणखी एका ट्विटमध्ये शरद पवारांनी पुरंदरे यांना पाठवलेले एक पत्र शेअर करत पवारांची पोलखोल केली आहे.

शरद पवार यांनी दि. 16 मे 1974 रोजी बाबासाहेब पुरंदरे यांना एक लेखी पत्र लिहून त्यांच्या कार्याचे आणि वाड्:मयाचे कौतुक केले होते. त्याचा हवाला देत निलेश राणे म्हणाले, पवारांचे राजकारण किती खालच्या पातळीचे असू शकते, याचा पुरावा. एका पत्रात पुरंदरेंचे कौतुक करणारे पवार यांना आता त्यांचे लिखाण चुकीचे वाटू लागले. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत.

थोडक्यात बातम्या –

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…

मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर

‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More