बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार चिरीमिरी खात नाही. संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर पत्र चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून याचा अजित पवार यांचा बचाव केला गेला आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका देखील करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते, असा खोचक प्रश्न अग्रलेखातून उपस्थित केला होता. त्यानंतर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

‘संजय राऊत यांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला होता. मुळात संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’, असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारला आहे. ‘दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही’, असं देखील निलेश राणे म्हणाले.

अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत टॉर्चचा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा’, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवार हे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते व आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे असणारच. ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे, असं देखील या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबो! 37व्या वेळी विवाहबंधनात 28 बायका, 135 मुलं, 126 नातवंडांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा; पाहा व्हिडीओ

कोरोना चाचण्यांच्या अहवालाची माहिती न देणाऱ्या लॅबचे परवाने होणार रद्द?; कारणे दाखवा नोटीशीनंतरही उत्तर नाही

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More