बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतला काय अधिकार मराठा समाजावर बोलण्याचा?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाविषयी ऐतिहासिक निकाल दिला. यात न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निकाल दिला आहे. यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगू लागलं आहे. विरोधीपक्ष ठाकरे सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप करत आहे. याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर कडवी टीका केली आहे.

“संज्या राऊतला काय अधिकार मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा? ज्या माणसाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आणि आजपर्यंत माफी मागितली नाही तो माणूस मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय योगदान आहे शिवसेनेचं? आम्ही आमचं बघून घेऊ संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा”, अशी कडवी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना असेल तर मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून पंतप्रधानांची वेळ मागणाऱ्या छत्रपती संभाजी राजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आमच्यासोबत यावं आणि त्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत, अशी टीका देखील निलेश राणे यांनी याआधी केली होती.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील राजकीय नेतृत्व अपयशी ठरलं”

…अन् 25 वर्षीय महिलेनं एकाच वेळी दिला चक्क नऊ बाळांना जन्म

डाॅक्टरांना राक्षस संबोधन आलं अंगलट; कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा दाखल

लाॅकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर रक्ताच्या थारोळ्यात

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More