बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केसरकर लायकी पेक्षा जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती”

मुंबई | तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीये हे आम्हाला माहिती आहे. कशाला उड्या मारता. मतदारसंघात तुमची काय लायकी आहे हे माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका, असा दम भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना दिला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नेहमी आदर आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी टीका थांबवावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. तसेच राणे बंधू अजून लहान आहेत. फडणवीसांना सांगून आम्ही त्यांनाही समजावून सांगू, असं ते म्हणालेत.

केसरकर यांच्या या वक्तव्याने भाजप (BJP) नेते निलेश राणे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. तुमची लायकी मतदारसंघात काय आहे आम्हाला माहित आहे. राणेच्या याच दोन मुलांनी तुम्हाला निवडणुकीत हरवलं आहे. दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका, असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी केसरकरांना दिलं आहे.

नुकतीच भाजप-शिंदे गटाची युती झाली आहे. मात्र काही  नेत्यांना हे पटलं नसल्याचं दिसून येत आहे. तसेच आता निलेश रांणेनी केललं हे ट्विट शिंदे -भाजपमध्ये वाद निर्माण करेल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More