Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. आता निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा उद्या शिंदे गटात पक्षप्रवेश :
माजी खासदार निलेश राणे हे उद्या (23 ऑक्टोबर) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यासंदर्भात निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती देखील दिली आहे. यावेळी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले आहेत. याशिवाय यंदाची विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.
याशिवाय निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल फोटोवर त्यांच्या फोटोसह शिंदे गटाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण देखील दाखवलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात देखील त्यांच्या प्रोफाइल फोटोची चर्चा सुरु झाली आहे.
Maharashtra l बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत
यासंदर्भात माहिती देताना निलेश राणे म्हणाले की, गेल्या कित्येक दिवसांपासून निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा राज्यात रंगली होती. मात्र आज अखेर निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
तसेच 2019 ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यासोबत निलेश राणे हे देखील भाजपमध्ये आले होते. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक ही आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे निलेश राणे म्हणाले आहेत.
News Title : Nilesh rane join shinde group
महत्वाच्या बातम्या –
फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी जबरदस्त SUV लाँच; जाणून घ्या फीचर्स व किंमत
महाराष्ट्रातील ‘या’ जागांवर होणार कांटे की टक्कर, पाहा कुणाचं पारडं भारी?
कट्टर समर्थकाचा अजित पवारांना मोक्याच्या वेळी धक्का, पुण्यात मोठी उलथापालथ?
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने केली सर्वात मोठी घोषणा!
ठाकरेंचे 53 शिलेदार ठरले?, पाहा कुणाला मिळालं तिकीट तर कुणाचा पत्ता कट?