बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निलेश राणे, नितेश राणे काहीच करू शकत नाही, कोणामुळे मोठे झालात हे विसरू नका”

मुंबई | शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणेंचा जोरदार समाचार घेतला आहे. निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत. ते नुसतेच बोलतात. आपण कोणामुळे मोठे झालोत हे त्यांनी विसरू नये, अशी टीका खैरेंनी केली आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली होती. त्यांना माहीतच असेल, असं सांगतानाच आपण कोणामुळे मोठे झालो हे ते विसरले असतील. बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका, असा सल्ला चंद्रकांत खैरे यांनी दिला.

आम्ही कधीही हिंदुत्व विसरत नाही. आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम चालू आहेत. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचं वाक्य आमच्या मनावर कोरलं आहे. मी शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करत आहे. बाळासाहेबांचे बाळकडूचे आमच्यावर संस्कार झाले आहेत, असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं.

मराठवाड्यातले आम्ही शिवसैनिक निजामाचे अत्याचार सहन करत आम्ही पुढे आलो आहोत. शिवसेनाप्रमुखांचा 1988ला मराठवाड्याला पदस्पर्श लागला आणि संपूर्ण चित्र बदललं. संपूर्ण मराठवाडा शिवसेनामय झाला आहे, असं खैरेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो- संजय राऊत

“कोरोनाची तिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यात येण्याची शक्यता”

“बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न शिवसेनेनं पूर्ण केलं; त्यांच्याच विचारधारेवर शिवसेना पुढे जातीये”

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More