Top News

भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर

मुंबई | बिहार निवडणूकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध अजून टोकाला गेल्याचं दिसून आलंय. भाजप नेत्यांनी ठाकरे कुटुंबाला जबाबदार धरल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी कडक शब्दांत इशारा दिला होता. तर यावरून भाजप नेत्यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलंय.

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका केलीये. निलेश राणे म्हणाले, “दिवस गेले ते अनिल परब… सगळ्यांना आता शिवसेना कळली आहे आणि शिवसेनेची फुसकी स्टाईल पण कळलीये.”

“किरीट सोमय्याजींनी केलेल्या आरोपांचं उत्तर द्या. एकही व्यवसाय नसताना सगळे व्यवहार केले कसे?? पैसे आले कुठून?? भाषा सांभाळून वापरा परब नाहीतर उलटे फटके पडतील,” अशा शब्दांत अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेना नेते संपतापले आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमय्यांवर टीकेची झोड उठवली होती.

महत्वाच्या बातम्या-

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा 

    “नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत” 

पुणे पदवीधरमध्ये “संग्राम”ने वाढवल्या भाजपसमोरच्या अडचणी!

“…राहुल गांधी शाळेतील वाईटातले वाईट विद्यार्थी, काँग्रेस नेते एकाच कुटुंबामागे कधीपर्यंत धावणार?” 

“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या