Nilesh Rane | अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने आता राज्यात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट यांची सत्ता आहे. महायुतीने मिळून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, या आघाडीमध्ये राहूनही काही नेते एकमेकांवर आगपाखड करत असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कालच एका ठिकाणी बोलताना भाजपवर निशाणा साधला होता.
राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी भाजपच्या 400 पार नाऱ्याबाबतही भाष्य केलं.
भुजबळ यांच्या या विधानावरच भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत भुजबळ यांच्यावर टीका केलीये. एकाच आघाडी मध्ये राहून या दोन नेत्यामध्ये सध्या जुंपल्याचं दिसून येतंय.
काय म्हणाले निलेश राणे?
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. असं निलेश राणे म्हणाले आहेत.
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे,
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं???
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.… pic.twitter.com/URRnsPQAhe— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 28, 2024
पुढे ते म्हणाले की, “आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही. कारण, भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.”, असं ट्वीट निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलंय.
छगन भुजबळ काय म्हणाले होते?
“देशात दलित समाजाच्या मनात भाजपाने 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर देशाचं संविधान बदललं जाणार, ही गोष्ट प्रचंड बिंबवली गेली. स्वत:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मुलाखती आणि प्रचारसभांमधून याचे उत्तर द्यावे लागले. एनडीए 400 पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही, ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले”, असं छगन भुजबळ म्हणाले होते. यालाच निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलंय.
News Title – Nilesh Rane on Chhagan Bhujbal
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत मोठी माहिती समोर
अजितदादानंतर आता पाण्यावरून भाजप नेत्याचे विधान, “मी काय फूक मारून…”
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज