मुंबई | भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीये. बीड अॅसिड हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध दर्शवत त्यांनी सरकारला धारेवर धरलंय.
हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे?, असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केलंय.
निलेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.”
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
बीडमध्ये एका तरूणीवर अॅसिड हल्ला करून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान या तरुणीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं
मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ
प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन
पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव