मुंबई | काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या 22 आमदारांनीदेखील आपला राजीनामा दिला आहे. यामुळे मध्यप्रदेशातलं कमलनाथ यांचं सरकार अस्थिर झालं आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीटमधून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत काँग्रेसला चिंतनाची गरज असल्याचं म्हटलं आहे.
सहजासहजी ज्योतिरादित्य सिंधिया राहुल गांधीला सोडेल हे कोणालाही खरं वाटणार नाही. ज्योतिरादित्य सिंधियांचं काँग्रेसला सोडणं म्हणजे राहुल गांधीचं हे सर्वांत मोठ अपयश आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
नेहमीप्रमाणे काही कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली असावी, अशीही टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे.
दरम्यान, दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मला काँग्रेस सोडताना दु:ख होत आहे पण ही काँग्रेस आता पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडणार म्हणजे राहुल गांधीचं हे सर्वात मोठ अपयश आहे. सहजासहजी सिंधिया राहुल गांधीला सोडेल हे कोणालाही खरं वाटणार नाही पण नक्कीच नेहमीप्रमाणे काही कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली असावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 11, 2020
ट्रेंडींग न्युज-
सावधान… पुण्यानंतर आता मुंबईमध्येही सापडले कोरोनाचे 2 रूग्ण
#Corona | कोरोना व्हायरसचा पहिला बळी
अबब! कोरोनाचा चिंचवडमध्ये शिरकाव… आढळली एक संशयित महिला
महत्वाच्या बातम्या-
“एकटे ज्योतिरादित्य शिंदेच जबाबदार का?, आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज”
सावधान… पुण्यानंतर आता मुंबईमध्येही सापडले कोरोनाचे 2 रूग्ण
भाजपचा दे धक्का!; महाराष्ट्रातील ‘या’ दोन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं!
Comments are closed.