मुंबई | मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला अाहे. ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करत सरकारला कोंडीत पकडत आहेत. आता माजी खासदार निलेश राणे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
मराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई-गोवा महामार्ग ठिय्या आंदोलन करून महामार्ग रोखला. तसंच मराठा मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
दरम्यान, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चांने सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाच्या मागणीवर काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला
मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीत सकल मराठा समाजासोबत माजी खासदार निलेश राणे रस्त्यावर @meNeeleshNRane @mataonline @Maha_Desha @MarathaOrg @santoshpparab #MarathaKrantiMorcha @saamTVnews @TV9Marathi pic.twitter.com/cCppSmAInH
— आदेश मोरे (@meAdeshMore) August 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!
-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!
-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय
-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!
-जळगावमध्ये शिवसेनेला धक्का; भाजपची जोरदार मुसंडी