Top News राजकारण

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

मुंबई | बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने म्हणजेच एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखलीये. यावरुनच भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

बिहारच्या निवडणूकीत काही ठिकाणी नोटाला शिवसेनेपेक्षा जास्त मतं पडल्याचं दिसून आलं. निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत आणि शिवसेना यांच्यावर टीका केलीये.

“शिवसेनेने स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल,” असं निलेश राणे म्हणालेत.

“संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील अशी खात्री आम्हाला आहे,” असा टोलाही त्यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीवर मुंबई भारी; पाचव्यांदा जिंकली आयपीएलची ट्राॅफी

‘विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं’; तेजस्वी यादव यांचा खळबळजनक आरोप

राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता व्यक्त केली हे चांगलं आहे, पण…- शरद पवार

“फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्राला पण देवेंद्र फडणवीसच पाहिजे”

संजय राऊतांचा गजनी झालाय, ते पराभव विसरतात- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या