बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं”

मुंबई | आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील. आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. राऊतांच्या या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणेंनी जोरदार समाचार घेतला आहे.

ईडी अशी कोणाच्याही हाती मिळत नसून ती कमवावी लागते आणि दोन दिवसांसाठी ईडीचे अधिकार असं मागत आहेत जणू जशी 2000 हजारांची नोट. पण भीक मागण्याची ही पद्धत बरी नसल्याचं ते म्हणाले. या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख केला आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती.

थोडक्यात बातम्या- 

महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं?; ‘या’ भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

पुण्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; आरोग्य विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

“…तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील”

“एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण शरद पवारांच्या…”

महाविकास आघाडीतील आमदारांबाबत देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More