Top News महाराष्ट्र मुंबई

…तर ठाकरे सरकार काय फक्त गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

मुंबई | महाराष्ट्रातील जनतेला वीजबिलांबाबत कुठलाही दिलासा देण्यास महाविकास आघाडी सरकारने नकार दिला आहे. त्याविरोधात आता भाजपसह विरोधी पक्षांनी चांगलीच टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन ट्विट केलं आहे.

अगोदर माझं कुटुंब, माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी, ठाकरे सरकार सुधरणार नाही, असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल प्रकरणी कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

निलेश राणे यांचं ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान!

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा- आशिष देशमुख

देवेंद्र फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना चितपट करु- जयंत पाटील

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या