Sharad Pawar l राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. खासदार नारायण राणे यांचे पुत्र तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी थेट केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने ‘झेड प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. यावरून निलेश राणे यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे.
भाजप नेत्याने शरद पवारांना टोला लगावला :
महाराष्ट्राचे भाजप आमदार निलेश राणे यांनी शरद पवारांना सुरक्षा मिळत असल्याचा टोला लगावला आहे. राणे म्हणाले कि, शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. 55 सीआरपीएफ त्यांचे संरक्षण करणार आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांना कोण मारेल आणि कोणाला धोका आहे? ही बातमी वाचून मला प्रश्न पडला की देशात आणि राज्यात 50 वर्षांनंतरही झेड प्लस सुरक्षा मिळते का? असा टोला लगावला आहे.
शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सींच्या धोक्याच्या मूल्यांकनाच्या पुनरावलोकनात पवारांना अधिक मजबूत सुरक्षा प्रदान करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Sharad Pawar l शरद पवारांना ‘झेड प्लस’ सुरक्षा :
केंद्राने शरद पवारांना ‘झेड प्लस’ श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान केले आहे. हे काम करण्यासाठी सीआरपीएफची एक टीम आधीच महाराष्ट्रात आहे. ‘झेड प्लस’ सुरक्षा ही सशस्त्र व्हीआयपी सुरक्षेची सर्वोच्च श्रेणी आहे. व्हीआयपी सुरक्षा श्रेणीचे वर्गीकरण सर्वोच्च ‘झेड प्लस’ पासून सुरू होते. यानंतर ‘Z’, ‘Y Plus’, ‘Y’ आणि ‘X’ येतात.
CRPF ची VIP सुरक्षा शाखा हा एक विशेष गट आहे जो गृह मंत्रालयाने नियुक्त केलेल्या लोकांना सुरक्षा प्रदान करतो. या व्हीआयपींमध्ये केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजकारणी, सरकारी अधिकारी, आध्यात्मिक नेते, व्यापारी आणि इतर प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
News Title : Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
अंगावर येईल काटा! पुणे-नगर महामार्गावरील अपघातात एक जण ठार
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक माहिती समोर
55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत
Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार, IMD कडून हायअलर्ट