“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”
मुंबई | जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं आहे. यावरून विरोधकांकडून नरेंद्र मोदींवर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही मोदींवर त्यांच्या खास शैलीत टीका केली. या टीकेला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत, ते मोठेच नेते आहेत. संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊतांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केली. पण, आक्षेप नक्की कोणाचा आहे? स्टेडियमला मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का?, असा सवाल राणेंनी विचारला आहे. तसंच सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचं नाव होतं. मग, सुब्रोतो रॉय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का?, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राउतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींचं नाव देऊ नाही तर स्टेडियमला देऊ. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचं ठरत असल्यामुळे, हे असले विषय काढून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, स्टेडियमला मोदींचं नाव दिल्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता.
थोडक्यात बातम्या-
अभिमानास्पद! काश्मीर खोऱ्यात जिल्हाधिकारीपदी मराठामोळे संतोष सुखदेवे
आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम; ‘या’ पक्षात केला प्रवेश
मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट
छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण प्रकरणावर गप्प का?- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.