रत्नागिरी | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. कोकणात भाजप खासदार नारायण राणेे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं सत्र पुन्हा सुरू झालं आहे. विनायक राऊत यांनी बुडत्याला काडीचा आधार, असं म्हणतं नारायण राणेंवर टीका केली होती. या टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
राणे समर्थकांनी विनायक राऊत यांचा पुतळा जाळला. त्याचबरोबर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी विनायक राऊत यांना दिला आहे.
भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु असून जी सत्ता केंद्रात आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा धंदा आहे. यासाठीच नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा विनायक राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेने नारायण राणेंच्या हॉस्पिटलला विरोध केला नाही, याउलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्यात आली. राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला होता, असा दावा विनायक राऊत यांनी केला होता. राऊतांच्या याटीकेवर निलेश राणेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.
भाजपच्या लाटेवर राऊत दोनवेळा निवडून आले आहेत. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. हे स्वत: नॉन मॅट्रिक आहेत. लोकसभेत बोलायला उभे राहिले की, काय बोलतात तेच समजत नाही, असा टोला निलेश राणेंनी राऊतांना लगावला.
थोडक्यात बातम्या-
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे
लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….
या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे
“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”
‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला