शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे ठाकरे गटाच्या नेत्याचा हात?, निलेश राणेंचा गंभीर आरोप

Nilesh Rane | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमीमध्ये प्रचंड नाराजी आहे. विरोधी गटाकडूनही आता राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. (Nilesh Rane )

अशात भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा हात असल्याची शंका उपस्थित केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

निलेश राणेंनी केलेलं ट्वीट काय?

भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणेंनी ट्वीट करत म्हटलं की, “आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो?”, असा सवाल निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी, असा इशारा देखील निलेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिला आहे. आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, ते पाहावं लागेल.

पुतळा कोसळल्यावर वैभव नाईक 15 मिनिटांत कसे पोहोचले?

दरम्यान, पुतळा कोसळल्यानंतर राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे किल्ल्यावर पाहणीसाठी आले, त्याचवेळी खासदार नारायण राणे आणि निलेश राणे (Nilesh Rane ) आधीपासूनच तेथे उपस्थित होते.

या दरम्यान, राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये चांगलाच राडा झाला.आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. अशात निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधत थेट आमदार वैभव नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

News Title –  Nilesh Rane serious allegations against MLA Vaibhav Naik

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 24 तास धोक्याचे?; IMD चा स्पष्ट इशारा

गुड न्यूज! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त?, जाणून घ्या लेटेस्ट दर

आज लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशी होणार धनवान, सर्व अडचणीही दूर होणार!

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

पुण्यातील ‘या’ भागात एटीएसची मोठी कारवाई! थेट दहशतवाद्यांशी संबंध…?