महाराष्ट्र मुंबई

“संभाजी महाराज आम्हाला माफ करा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या”

मुंबई | मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला. यानंतर कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणाऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 3 ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीये.

छत्रपती संभाजी महाराज आम्हाला माफ करा तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या ह्या पेक्षा मोठं दुर्भाग्य काही नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.

ज्या संभाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य स्वराज्यासाठी संपवलं त्यांचा आपण रोज अपमान करतोय हेदेखील शिवसेनेला भान नाही, असा घणाघात राणेंनी केला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केली, ते पंचायत समिती सदस्य भाजपमध्येच”

MPSC च्या परीक्षा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परिक्षा

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

येत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या