महाराष्ट्र मुंबई

“प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा”

मुंबई | शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे, असा टोला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेलं?, असं म्हणत निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी… नुसतं बोलबच्चन., असा टोलाही निलेश राणेंनी लगावलाय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलंय, मात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला असून त्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल!

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?- विजय वडेट्टीवार

“उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील”

देशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या तीन युवा नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या