बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्ता बदलली, आता गाठ माझ्याशी आहे’; निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

मालवण | भाजपचे खासदार निलेश राणेंनी (Nilesh Rane) मालवण (Malvan) नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना झापले. मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात मुसळधार पावसाने नागरीकांच्या घरात पाणी शिरले, गटारे भरुन रस्त्यांवर पाणी आले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे नगरपरीषदेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावेळी राणे मालवण नगरपरिषदेवर गेले होते.

राणेंनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना चांगलेच धारेवर धरले. आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? असा सवाल करत करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी राणेंनी आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे. असा दम देखील अधिकाऱ्याला दिला. सत्ताधाऱ्यांसोबत मिळून तुम्ही मालवण शहराची वाट लावली असे देखील राणे म्हणाले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, मी यापूर्वी देखील तुम्हाला वाईन शॉपची तक्रार दिली होती. पण तुम्ही कोणतीही कारवाई केली नाही. अशी आठवण करुन देत राणे म्हणाले, आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हा गप्प बसलो होतो. पण आता गप्प बसणार नाही. आता टेबल फिरले आहे.आमच्या वाकड्यात जाऊ नका असे तुम्हाला मागे सांगितले होते, अशा शब्दात राणेंनी अधिकाऱ्यांचा पाहुणचार घेतला.

ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात तुम्ही नालेसफाई करता, असा आरोप करत राणे म्हणाले. मी तुमच्या हातात निवेदन देणार नाही. आपले हात पवित्र नाहीत, त्यामुळे टेबलवरचे निवेदन उचला आणि कामाला लागा.

थोडक्यात बातम्या –

तीव्र विरोधानंतर ‘अग्निपथ’ योजनेबाबत राजनाथ सिंह यांनी घेतली महत्त्वाची बैठक

‘मी काही इतक्या लवकर जात नाही’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर तरूणांनी केला नागीन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा खेळ आता वेब सिरीजमध्ये दिसणार; “मी पुन्हा येईन” चा टीझर प्रदर्शित

खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More