मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक कारणांवरुन शिवसेनेत बंड केले आणि आपला वेगळा गट उभारला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने शिंदे सरकार स्थापन केले आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप नेत्यांनी शिवसेनेवर सतत टीका करण्याचे सत्र चालू ठेवले. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केले आहे. आता या चिखलफेकीत भाजप आणि शिंदे गटातच वाद पेटले आहेत.
भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, म्हणून तुम्ही इथे आलात. जे डुप्लिकेट हिंदुत्व दाखवत होते, त्यांच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला राग का यावा? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे. त्यांचा तुम्हाला एवढा पुळका कशाला? असेही राणे म्हणाले.
दीपक केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत परंतु ते असे वागतात जणू काय ते विश्र्व प्रवक्ते आहेत. त्यांना सगळ्यातील सर्व कळते अशा अविर्भावात ते असतात. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय जीवनदान दिले. राजकीय कुबड्या दिल्या. जितकी ही भाजप-शिंदे गटाची युती टिकविण्याची जबाबदारी आमची आहे, तेवढीच त्यांची देखील आहे. केसरकरांनी नको त्या गोष्टीत पडू नये, असा सल्ला राणेंनी केसरकरांना दिला.
काही दिवसांपू्र्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) उद्धव ठाकरेंचा माफिया उल्लेख केला होता. तेव्हा शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. तसेच रोज उठून भाजपचे आमदार आणि नेते उद्धव ठाकरेंना बोलतात हे देखील शिंदे गटाला रुचत नाही आहे. त्यामुळे या युतीत देखील वादाची ठिणगी पडली आहे.
थोडक्यात बातम्या –
शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…
मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती
देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?
राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
Comments are closed.