बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

मुंबई | महिला सुरक्षा हे कोणत्याही सरकारचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. सध्या देश आणि राज्यात महिला असुरक्षिततेच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यात गेली काही दिवसांत महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. त्यातच आता निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यातील महिला सुरक्षा हे सरकारचं काम आहे. कोणत्याच सरकारला राज्यातील महिला असुरक्षित रहाव्या असं वाटत नाही. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच हे वक्तव्य करताना राऊतांनी रामायणाचा दाखला दिला आहे. यावर माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे. ज्या डॉ महिलेला खोट्या केसमध्ये 52 दिवस तुरुंगात ठेवलं, सातत्याने अनेक वर्षापासून छळतोय, तिला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही त्या माणसाने महिला सन्मानच्या गोष्टी करु नये. या जहरी शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राज्यातील राजकारण महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून चांगलच पेटणार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधक करत आहेत. निलेश राणे यांच्या टीकेनंतर आता संजय राऊत आणि राणे यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे संजय राऊत निलेश राणे यांनी काय उत्तर देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

स्वाभिमानीचंही एकरकमी FRPसाठी डिजिटल आंदोलन, सहभागी होण्याचं आवाहन

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

“मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही”

अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलणार, आता वाजणार ‘ही’ नवी धून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More