Top News महाराष्ट्र मुंबई

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

मुंबई | भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत दहा बालकांना आपला जीव गमवाव लागला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीबाबत आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आलं. त्यानंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, असंही निलेश राणे म्हणाले. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान,सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”

मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली!

राज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद लाड

‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट

भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा- प्रवीण दरेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या