Top News महाराष्ट्र मुंबई

‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

मुंबई | जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तिन्ही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री यांमी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. या माणसाला शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. राणेंसोबक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते, असं पाटील म्हणाले होते.

दरम्यान, भाजपकडून होत असलेल्या टीकेवर अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…

“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि मिळवा एक लाखाचं बक्षीस

”इतक्या’ वर्षात देश होणार टोलमुक्त’; नितीन गडकरींची घोषणा

पहिल्या टप्यात राज्यातील ‘इतक्या’ जनतेला लस देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या