मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत महाराष्ट्राला झोपेतून उठल्यावर मोठा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर 80 तासात फडणवीस सरकार पडलं. भाजपला याची सल कायम मनात राहणार आहे. मात्र सध्या पवार म्हणाले की भाजपचेच आमदार आणि काही नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. यावरून भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
अजित पवार हे स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच, त्यावर स्वत:चं लेबल लावू नये. पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये, असंही राणेंनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना भारताने काय केलं?”
“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”
कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत-पंतप्रधान नरेंद्र मोद
“उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा”
…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत