Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर पवार साहेब ‘सीरम’मध्ये वशिला लावतील”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना कोरोना लस केव्हा घेणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणेंनी पवारांवर खोचक टीका केली आहे.

कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजित पवरांना विचारला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश राणेंना पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं  ठरणार आहे.

दरम्यान, आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल, त्यावेळी घेऊ आणि तुम्हाला सांगू, असं अजित पवारांनी लस कधी घेणार यावर उत्तर दिलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

‘बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यु दाखवा अन्…’; बर्ड फ्लूच्या अफवा रोखण्यासाठी दुग्धविकास मंत्र्यांची आयडियाची क्लपना

आघाडीत बिघाडी करायची नाही त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही- अशोक चव्हाण

धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं

नोटाबंदीनंतर चलनातील या महत्वाच्या नोटा होणार बंद??; RBI ची महत्वाची माहिती

‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या