Top News महाराष्ट्र रत्नागिरी

…तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही- निलेश राणे

रत्नागिरी | अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रत्नागिरीत ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीयेत जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे याचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

आपल्या शपथविधीला येणारा माणूस शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जातं. तोच माणूस आज भाजपवर टीका करतो ती टीका का सहन करायची, असा सवालही राणेंनी केला आहे.

दरम्यान, प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का?, असा टोला राणेंनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील ‘या’ तरुणीने तब्बल 16 तरुणांना अडकवलं आपल्या जाळ्यात; 15 लाखांहून अधिक किंमतीचा लुटला ऐवज

‘भाजपनं आधीच सुधीर मुनगंटीवारांकडं जबाबदारी दिली असती तर…”

भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या- रूपाली चाकणकर

“…तर मग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

…अन् पाणी समजून त्या सरकारी अधिकाऱ्यानं प्यायलं सॅनिटायझर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या