मुंबई | राज्याच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री बदलणार असून त्याजागी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी खलबळजनक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट आहे.
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे, असंही राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देताना या वायफळ चर्चा असल्याचं म्हटलं आहे.
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 4, 2021
थोडक्यात बातम्या-
“लोकशाहीविरोधी वागणाऱ्या कुठल्याही शक्तीला जनतेनं सोडलं नाही, त्यांना धडा शिकवला”
“कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही”
स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार