बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवांरांना शोधा, तुमच्या घरात शिरून भाजपने तुम्हाला ठोकलंय”

मुंबई | पोटनिवडणुक पंढरपूरच्या निकालाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पिछाडीवर पाडत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आवताडेंचा विजय होणार असल्याचं निश्चित आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रावादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्या अजित पवारांना शोधा. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून भाजपने तुम्हाला ठोकलंय, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी शिवसेना नेेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?, बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संजय राऊत स्वतः कधी निवडून येणार ते सांगा?, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची सीट राखता राखता महाविकास आघाडीचे कपाळात आलेत आणि वार्ता छाती ठोकपणे बंगालची करतायेत. अरे बंगालमध्ये बीजेपी हरली तरी 3 वरून 100 जवळ चालले तुम्ही 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने तुमचा घाम काढला, असंही राणे यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम”

चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा- प्रकाश राज

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More