बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

मुंबई | भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. 2024 ला तुमचा पराभव बघायचा होता पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार. कोणालाही उर्मट बोलायचं, कोणाचे राजकीय किंवा कौटुंबिक आयुष्य उध्वस्त करायचं, नियती कोणाला सोडत नाही अजित पवार, असंही निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटल आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अमित शहा चंद्रकांत पाटलांना किती गांभीर्याने घेतात हे माहित नाही”

धक्कादायक! बुलडाण्यातील रूग्णालयात एकाच कोरोना रुग्णाला दिले तब्बल 14 रेमडेसिविरचे डोस

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत अफेअरच्या चर्चांवर अलायानं केला खुलासा, म्हणाली….

“होय, मी धमकी देतोय! भाजप नेते मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील”

चिंताजनक! डेल्टा प्लसनंतर कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय ‘हा’ नवा धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More