बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

मुंबई | नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

भास्कर जाधव, तुमची औकात 2024 ला दाखवून देऊ. वाळू चोर भास्कर जाधव, तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले, तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत. कुत्र्यासारखं भुंकत बसणं आणि समाजाला काही न देता नुसतं रडत बसणं हे तुमचं राजकारण लवकरच संपणार, असं म्हणत निलेश राणेंनी भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

भास्कर जाधवांनी राणे पुत्रांवर टीका करताना नारायण राणेंवरही टीका केली होती.  शिवसेना वाढीमध्ये नारायण राणेंचा काढीभर हात नाही. राणे गेले तेव्हा शिवसेनेचे 9 आमदार घेऊन गेले. त्यातील एकतरी आमदार दुसऱ्या निवडणुकीत आला का?, ते स्वत: तरी आले का निवडून आले का, असं जाधव म्हणाले होते.

दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर भास्कर जाधव काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

महत्त्वाची बातमी! राज्यातील 25 जिल्हयांमधील निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”

‘अजित पवारांनी भाषेबाबत बोलणं म्हणजे राज कुंद्राने…’; नितेश राणेंची जोरदार टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More