Top News महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी

‘…तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल’; दिशा सालियान प्रकरणाचा धागा पकडत राणेंची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

रत्नागिरी | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या एक आठवड्यापुर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियानने आत्महत्या केली होती. मात्र ही हत्या असल्याचं बोललं जात होतं. तर एकीकडे यावरून राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बलात्कार कोणी केला आणि हत्या कोणी केली. जर तपास बाहेर आला तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे.

सत्य बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सुशांत प्रकरणावरूनही निशाणा साधला.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतची बॉडी एम्सकडे नव्हती. त्यामुळे एम्सलाही मर्यादा पडल्या. या प्रकरणात जे डमी पुरावे दिले गेले त्यानुसारच तपास झाला असल्याचं म्हणत पुरावे कुणी नष्ट केले, याचा अहवाल सीबीआयने द्यावा, अशी मागणीही राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना 100 पत्र; मात्र उद्धव ठाकरेंकडून एकाचंही उत्तर नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

‘मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी’; कंगणा राणावतचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांचा 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा…; खासदार भावना गवळींचा इशारा

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या