बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

मुंबई | पावसाळा आला की मुंबईतील रस्ते आणि खड्डे एकत्र समीकरण पाहायला मिळतं. या खड्ड्यांचं खापर मुंबई महापालिकेवर फोडलं जातं. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेना वर्चस्व गाजवत आहे.  त्यामुळे शिवसेनेवर खड्ड्यांवरून टीका केली जाते. यंदाच्या वर्षीही मुंबईचे महापौर किशोरी पेेडणेकर अधिकाऱ्यांची शाळा घेताना दिसल्या. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी पेेडणेकरांवर निशाणा साधला आहे.

आम्ही मराठी सिनेसृष्टीत हा व्हिडीओ पाठवणार आहोत, जेणेकरून 2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड हा आमच्या महापौर मॅडमना मिळालाच पाहिजे. इतकी सहज एक्टिंग करणं अशक्य आहे. दिग्गज कलाकारांनासुद्धा अशी एक्टिंग जमणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

सोमवारी किशोरी पेडणेकर पहाटे बाहेर पडल्या होत्या. महापौर सरळ पोहचल्या चेंबरच्या रस्त्यांवर आणि त्यावेळी तिथं मनपा अधिकारी आधीच हजर होते. एका ठिकाणी खड्डे दिसल्यावर किशोरी पेडणेकर संतापलेल्या दिसल्या त्यांनी थेट फाईल फेकण्याचा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

दरम्यान, निलेश राणे यांनी पेडणेकरांचा तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर किशोरी पेडणेकर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जर काँग्रेस वाचली नाही तर….’; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार गरजला

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल ‘इतका’ खर्च

दिल्लीचा विजयरथ अखेर कोलकाताने रोखला! कोलकाताचा दिल्लीवर धमाकेदार विजय

“जयंत पाटील आले, मात्र एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत”

“पुढची दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवू शकणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More