मुंबई | शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसेच ऑफीसवर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर ईडीकडून प्रताप सरनाईक यांची पाच तास चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, मी नरवीर तानाजी मालुसरेंसारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नसल्याचं म्हटलं होतं.
प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरनाईकांवर निशाणा साधला आहे. अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे. तानाजी मालुसरेंच्या नखाचीही सर नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेला प्रताप सरनाईक आता महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची बदनामी करत आहेत, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
तुलना करणं तर सोडून द्या पण एकही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं, असंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नरवीर तानाजी मालुसरेंचं नाव सरनाईक यांनी घेतलं आहे. तानाजी मालुसरे हे सिंहगड किल्ला स्वराज्यात घेताना त्या लढाईत धारातीर्थी पडले होते. त्यामुळे इतिहासातील दाखले देत सध्याच्या परिस्थितीशी तुलना करणं कितपत योग्य आहे?, हे प्रत्येक राजकारण्याने आणि नागरिकाने ठरवायला हवं.
अशा लोकांना लाथेने तुडवलं पाहिजे. तानाजी मालुसरेंच्या नखाचीही सर नसलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत गेलेला प्रताप सरनाईक आता महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची बदनामी करत आहेत. तुलना करणं तर सोडून द्या पण एकही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं. pic.twitter.com/Nqw2SPZx0t
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 14, 2020
थोडक्यात बातम्या-
रवी राणांच्या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संतापल
ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश
“सरकारी तिजोरी मंत्र्याच्या बंगल्यावर आणि दालनावर रिकामी होत आहे… बेशरम ठाकरे सरकार”
2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण
“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”