बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कोविड सेेंटरमधील रूग्णांसोबत त्यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरलेला व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणेंनी टीका केली आहे.

आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो. स्वतःची बाजू घेण्यासाठी सांगतो की मी नेहमी जाऊन सेंटर मध्ये नाचतो. नाचा, जेवढं नाचायचं तेवढं 2024 पर्यंत नाचून घ्या, असं म्हणत निलेश राणेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला. याआधीही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका केली होती.

सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का?, कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी करोना नियमांच गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

डाॅक्टर होऊ घातलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी; मित्रांनी उपचारासाठ जमवले होते पैसे

लोकांना लसी मिळत नाहीत आणि ‘या’ तीन राज्यात वाया जातात सर्वाधिक लसी!

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

पोलिसांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचं उल्लंघन करत बर्थडे सेलिब्रेशन करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात

भाजपला धक्का! 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती बांधलं शिवबंधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More