“चोरी पकडली जाऊ नये, म्हणून संजय राऊत बॅकफूटवर गेलेत”
मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा सपाटा सुरु आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची घुसमट होताना पहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीनं (Ed) मोठी कारवाई केली आहे.
संजय राऊत यांची ईडीनं संपत्ती जप्त केली आहे. यावरुन आता राजकीय भुकंपाला सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. ईडीच्या कारवाईनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊतांनी याआधीही इन्कम टॅक्सचे पैसे चोरले होते, चोरी करण्यात त्यांचा जुना हात आहे. त्यामुळे ईडीने केलेली ही कारवाई रितसर असल्याचंही निलेश राणे म्हणाले. चोरी पकडली जाऊ नये, म्हणून ते बॅकफूटवर गेले आहे. तसंच राऊत किती मोठे फ्रॉड आहेत? हे महाराष्ट्राला कळेल, असा घणाघातही निलेश राणेंनी केला आहे.
दरम्यान, गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे.1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.
थोडक्यात बातम्या –
“….तर मी सर्व मालमत्ता भाजपला दान करायला तयार आहे”
संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांचं पहिलं ट्विट, म्हणाले…
Breaking| ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; भाजप आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ
राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्ते नाराज?, म्हणाले…
Comments are closed.