Top News

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदार संघात कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी तब्बल 81 किलोचा केक आणण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता गोविंदाला बोलवण्यात आलं होतं.

धनंजय मुंडे आणि अभिनेता गोविंदाने केक कापून कार्यक्रम संपवला. मात्र त्यानंतर स्टेजवर मोठा गोंधळ उडालेला दिसला. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

मन खचून गेले हे बघून… महाराष्ट्रात 60 वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात काहीना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या 60 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते, असं निलेश राणे यांमी म्हटलं आहे. केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती यासंदर्भातील व्हिडीओ राणेंनी शेअर केला आहे.

दरम्यान, केक कापून झाल्यावर कार्यक्रम संपला खरा पण नंतर केक खाण्यासाठी उडालेली झुंबड पाहता कार्यकर्त्यांसाठी केक कापून झाल्यानंतरच खरा कार्यक्रम चालू झाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. परळीमधील हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणवीसांचा सरकारला इशारा

“उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं”

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?

‘ही तर ठाकरे सरकारची हुकूमशाही’ म्हणत भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या