बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने आधीच सर्वत्र हैदोस घातला असताना बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदींनीही ऑक्सिजन देण्यासाठी काहीतर करा, असं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र लिहित ऑक्सिजन निर्मितीसाठी पत्र लिहिलं आहे.

राज्यातील सर्व सहकारी कारखाने तसेच 190 खाजगी कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. याशिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. मात्र यावरून त्यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोपही राणेंनी यावेळी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, निलेश राणेंनी आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला होता. अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे, असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

“साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी”; शरद पवारांचं सर्व कारखान्यांना पत्र

आता आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास; जाणून घ्या ई-पास कसा काढायचा?

“ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपद जाईल त्या दिवशी…”; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा

“किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं, राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More