Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

‘सरकारचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम डुप्लिकेट कारण…’; निलेश राणेंची टीका

Photo Courtesy- Facebook/Nilesh Rane-Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग | भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारने शिवजयंतीसाठी दिलेल्या आदेशांना केराची टोपली दाखवत शेकडो कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने छत्रपतींच्या गादीचा अपमान केल्याचा आरोपही राणेंनी केला.

शिवनेरी किल्ल्यावर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यासोबतच शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये, उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील महाराजांच्या गडासाठी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. यामिलेशा आहे. इतकी वर्ष होऊनही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. कोरोणाचं कारण सांगत आहेत मात्र जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. शिवरायांबद्दलचं शिवसेनेचं प्रेम हे दाखवण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असून हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आलं आहे, असं म्हणत राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरी झाली. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाचा शिवजयंतीच्या उत्सवावर कोणताही परिणाम झाला नाही.

थोडक्यात बातम्या-

अर्जुन तेंडुलकर मेहनती मुलगा; अंबानींकडून सचिनच्या मुलाचं तोंडभरुन कौतुक!

“ठाकरे सरकारचे शिवजयंतीवर निर्बंध मात्र शरद पवारांच्या उपस्थितीत मटणपार्टीला परवानगी”

गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या