Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीपेक्षा बेवड्यांची सोय करण्यामध्ये सरकारला जास्त इंटरेस्ट”

मुंबई | कोरोनाच्या काळात प्रभावित झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांना दिलासा देण्याबरोबरच, अन्न पुरवठा, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसईबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन निधी हे सरकार देणार होतं ते शेतकऱ्यांना मिळालेच नाही पण बेवड्यांची सोय करण्यामध्ये या सरकारला जास्त इंटरेस्ट असल्याचं निलेश राणे म्हणाले.

मद्यविक्रेत्यांना सुट देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला. लोकहिताचे निर्णय ठाकरे सरकार घेत नसल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात राणेंनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, निलेश राणेंच्या या टीकेवर महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

राजधानीत भाजप कार्यकर्त्यांनी आपच्या आमदाराचं फोडलं ऑफिस; पाहा व्हिडीओ

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘अशा’प्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते; अनिल परब यांनी मनसेवर टीका

‘राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी’; आशिष शेलारांचा शेट्टींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या