मुंबई | पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली पाहायला मिळत आहे. भाजपनेही आपली जागा मजबूत करण्यासाठी सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणेंनी पवार, ठाकरे आणि बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
निलेश राणेंनी याबाबत ट्विट करत त्यामध्ये एका सभेचा व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी पवार, ठाकरे आणि बॅनर्जी यांना टोला लगावला आहे.
बंगालमध्ये भाजपची सभा.. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंव्हा ठाकरे, पवार ते आडवे करणारच, असं राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच, असंही राणेंनी म्हटलं आहे. राणेंनी केलेल्या या टीकेवर पवार आणि ठाकरे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बंगाल मध्ये BJP ची सभा… एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंव्हा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संज्या हे बघून ठेव, विसरू नको. अति तिथे माती होणारच. pic.twitter.com/9GoFA5O3Y5
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 20, 2020
थोडक्यात बातम्या-
माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकर
‘संतोष पोळने माझ्यासमोर….’; माफीची साक्षीदार ज्योती मांढरेची कोर्टात साक्ष
सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप
शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील