मुंबई | नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीसांनी परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली असल्याचं खासदार विनायक राऊत विनायक राऊत यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मिलिंद नार्वेकरांपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सर्व शिवसेनेचे नते भेटायला यायचे याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आता जे मंत्री आहेत ते राणे साहेबांकडे उद्धव ठाकरेंची किती कामं घेवून यायचे त्याची माहिती आमच्याकडे सुद्धा असल्याचं राणे म्हणाले.
बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नाही. विनायक राऊतांनी उड्या मारु नयेत. आम्ही स्वयंभू आहोत त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी माझ्या हिमतीवर मेडिकल कॉलेज उभारलं आहे. मी कधीही मातोश्रीवर फोन केला नसल्याचं नारायण राणेंनी म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
व्हॉट्सअपला मोठा झटका; ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला मोठा निर्ण
“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”
मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???
‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य