बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे निलेश राणे संतापले

मुंबई | आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे आता विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे राजू नवघरेंसह महाविकास आघाडी सरकारलाही टीकेचा सामना करावा लागत आहे. राजू नवघरेंवर चौफेर टीका होत असताना आता भाजप नेते निलेश राणेंनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे.

‘राष्ट्रवादी पक्षात औरंगजेबाच्या औलादी आहेत’, असा घणाघात निलेश राणेंनी केला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हरामखोराला भर रस्त्यात फटके टाकले पाहिजेत’, अशी संतप्त प्रतिक्रीया निलेश राणेंनी दिली आहे. राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आली आहे, त्यांची जिरवल्याशिवाय पर्याय नाही, असा हल्लाबोलही राणेंनी केला आहे.

नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा, असं खुलं आव्हान निलेश राणेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं आहे. वसमत येथे महाराजांच्या पूर्णाकृती पूजनाच्या वेळी राजू नवघरे यांचा हा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओवरून आता राजकारण तापताना दिसत आहे.

हे सगळं माझ्यासारख्या सामान्य माणसाला जाणीवपूर्वक हे षडयंत्र करून फसवलं जात असल्याचं स्पष्टीकरण राजू नवघरे यांनी या घटनेनंतर दिलं आहे. स्पष्टीकरण देताना नवघरे ढसाढसा रडले पण विरोधी पक्षांनी एकत्र येत त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. हा महाराजांचा अपमान आहे म्हणत विरोधी पक्षांनी या व्हिडीओचा तीव्र निषेध केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका”

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More