महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

नितेश आणि निलेश राणेंमध्ये मतभेद आहेत का?; निलेश राणे म्हणतात…

कणकवली | नितेश राणे आणि माझ्यात काहीच मतभेद नाहीत. निलेश राणे जेव्हा मरेल त्याचवेळी नितेशची साथ सोडेल, असं वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असंही वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. शिवसेनेबाबतच्या भूमिकेवरून नारायण राणेंच्या दोन्ही मुलांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं.

नितेश राणेंचं वक्तव्य निलेश राणे यांना मान्य नाही. याबाबतचं एक ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात राणे कुटुंबात मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली.

आमच्या राणे साहेबांवर टीका केली तर आम्ही जशास तसे उत्तर देणार असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल त्याच वेळी आम्ही शांत राहणार याचा पुनरोच्चार त्यांनी केला. तुम्ही आमचा तिरस्कर करायचा आणि आम्ही तुम्हाला ओवाळायच का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या