बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टीका

नवी दिल्ली | शरद पवारांनी भरपावसात घेतलेल्या सभेने सत्तेचं गणित बदललं आणि दोन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापित होऊ शकली, असं म्हटलं जातं. या घटनेला काल 2 वर्ष पूर्ण झाल्याने सोशल मीडियावर यासंदर्भात सर्वत्र पोस्ट केल्या जात होत्या. याबाबत आता निलेश राणे यांनी ट्विट करून टीका केली आहे.

निलेश राणे यांनी आता पावसात घेतलेल्या सभेवरून शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “काय झालं जर पवार साहेबांच्या सभेला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला ते पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं ते पण सांगा.” असा खोचक सवाल त्यांनी ट्विटमधून विचारलाय.

याशिवाय ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र एक नंबर पण कशात तर फक्त कोरोनामध्ये, असे विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये महत्त्व अधिक असतं”, अशी जहरी टीका त्यांनी ट्विटमधून केली आहे. निलेश राणे नेहमीच आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका करताना दिसतात.

दोन वर्षांपूर्वी कालच्याच दिवशी शरद पवारांनी घेतलेली सभा विशेष गाजली होती. त्या सभेमुळेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकली, असंही म्हटलं जातं. त्यामुळे काल पुन्हा एकदा अनेकांनी या सभेची आठवण काढली होती. त्यावरूनच निलेश राणे यांनी पवारांवर टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More