मुंबई | राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी राष्ट्रवादीने (NCP) संभाजीराजेंना (Sambhajiraje Chhatrapati) पाठिंबा दर्शवला होता. राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेना (Shivsena) व काँग्रेसची (Congress) देखील हीच भूमिका असेल असं वाटत असताना शिवसेनेने दोन जागांवर उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली.
शिवसेनेच्या या निर्णयानंतर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली. यादरम्यान भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत संभाजीराजेंना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभारणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, असं म्हणत निलेश राणेंनी संभाजीराजेंना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, पवार कधीच मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, अशा शब्दात निलेश राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येणार हे बघावं लागेल.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेला अपक्ष उभे राहणार अशी घोषणा केली आणि लगेच पवार साहेबांनी आमची उरलेली मतं राजे ना देऊ सांगून राजेंना अडचणीत टाकलं. उरलेली मतं राजघराण्याला?? राजे, यांचा डाव ओळखा आणि आत्ताच योग्य तो निर्णय घ्या कारण हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2022
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राजीव गांधींच्या मारेकऱ्याची तब्बल 31 वर्षांनंतर जेलमधून सुटका
मोठी बातमी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर!
हार्दिक पटेल यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.