मुंबई | भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
भाजपने निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश सचिवपदी निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, निलेश राणे हे ट्वीटरवरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावर एकेरी शब्दांत टीका करताना दिसतात.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकार कधी पडेल हे मी आता सांगणार नाही, कारण…- नारायण राणे
“धनंजय मुंडे यांचा जीव शरद पवार नावाच्या पोपटात अडकला आहे”
“कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं, हे चुकून इकडं आलेत”
“जनतेला ठाकरे सरकारचा कंटाळा आला आहे”
श्रीपाद नाईक यांचा रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल!